कंठाळे व हांगे दोन्ही महसूल कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई..
कणकवली :
देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करता मुख्यालय सोडू नये असे आदेश असताना देखील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्या दरम्यान राजशिष्टाचारानुसार कोणतेही आदेश नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याप्रसंगी हेलिपॅड वर त्यांचा सत्कार करण्याकरता गेलेले व यापूर्वी लाचलुचपत खात्या अंतर्गत केलेल्या कारवाईत निलंबित करण्यात आलेले ग्राम महसूल अधिकारी विठ्ठल वैजिनाथ कंठाळे आणि सहाय्यक महसूल अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी तात्काळ निलंबन केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना असलेल्या झेड प्लस सुरक्षा दरम्यान कोणतीही छाननी न करता सदर कर्मचारी त्यांच्यापर्यंत गेले कसे ? मुख्यमंत्र्यांचे सुरक्षेमध्ये त्रुटी कशा राहिल्या ? या संदर्भात खुलासा करण्याची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिली आहे.
त्याच सोबत करंजे येथील गोशाळेच्या व मालवण येथील छत्रपतींच्या पुतळ्याच्या पूजनाच्या कार्यक्रमाच्या स्थळी नियुक्ती असताना देखील सदर कर्मचारी मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले कसे ? याबाबत आपण आपली संपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी गांभीर्याने पार पडली नसल्याबाबत तात्काळ खुलासा सादर करावा, अशी नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर व अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील यांना दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा दरम्यान झालेला ढशाळपणा समोर आला आहे. नुकत्याच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात त्यांच्या सुरक्षित बाबत झालेला ढोसाळपणासमोर आल्यानंतर निलंबित असलेल्या या दोन कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या सत्कार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
याबाबत माजी आमदार वैभव नाईक यांनी या दोन्ही महसूल कर्मचाऱ्यांवर आरोप केले होते ? तसेच या कर्मचाऱ्यांचा आका कोण ? असा सवाल उपस्थित केला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत या दोन्ही महसूल कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तशेच हांगे आणि कंठाळे यांना निलंबन कालावधीसाठी दोडामार्ग तहसील कार्यालय येथे नियुक्ती देण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये गंभीर त्रुटी राहिल्याने पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना खुलासा सादर करणे संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. तर सदर दोन्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील व कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना या ठिकाणच्या कार्यक्रमाचे नियंत्रणाची जबाबदारी आपल्यावर असताना आपण गांभीर यांनी ही जबाबदारी पार पाडली नसल्याचे दिसून येत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या झेड प्लस सुरक्षा असताना देखील सदर कर्मचारी त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे पर्यंत गेले ही बाब गंभीर असून तात्काळ फुल असा सादर करा असेही आदेश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे.

