*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कॅमेर्यासोबतचं…माझं जगणं..!!*
किती.. कसे आवरावे
तुझ्यापुढ्यात.. उभं ..राहणं
काळीज अंथरायला लेन्सद्वारं
निरंतर….. उघडं… जपणं..!
मी..पणाचा गर्व मिरवत
निसर्गदेव माझ्यातं फुललेला
कॅमेर्यासोबतचं रोजचचं जगणं
पुण्याईची सिध्दी.. प्रकृतीला..!
माणसा-माणसांना कवेत घेतं
स्नेहभावनांची वाहतो धुरा
कैदेत घालतो …ह्दयांना
टाळतो ….अभद्र तोरा…!
आतल्याआत आनंदी राहत
तुझ्यातून उर्मींना फुलारतो
सहिष्णुतेचं सारथ्यं करत
स्वर्गारोहणाची चित्रं काढतो..!
लेन्समधून मायेने शृंगारताना
माझ्या जगण्याला सजवलसं
पैलू उलगडून व्यक्तीमत्वाचे
स्वतःच्याचं प्रेमांत पाडलसं..!!
बाबा ठाकूर धन्यवाद

