You are currently viewing परिचारिका आणि आपण… एक नाते

परिचारिका आणि आपण… एक नाते

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित परिचारीका दिनानिमित्त अप्रतिम लेख*

 

*परिचारिका आणि आपण… एक नाते*

 

आयुष्यात प्रकृतीसंबंधी अनेक बरेवाईट प्रसंग घडतात.कधी आपल्या तर कधी सख्ख्या, जवळच्या कुटुंबियांबाबत.अशावेळी आधी दृष्टीपुढे येतात ते दवाखाना,डाँक्टर व तेथील सेवाभावी तत्पर परिचारिका!

रुग्णाला दवाखान्यात भरती

करण्यापासून तर रूममधे अँडमीट करेपर्यंत आपली मनस्थिती घाबरलेली गोंधळलेली असते.

अशावेळी त्या सर्व समजून घेतात ..काळजी करू नका,होईल सगळं ठीक असा नातेवाईकांना धीरही देतात.निष्णात डाँक्टर आपल्या कामात व्यग्र असल्याने आपण त्यांना फारसे सांगू,विचारू शकत नाही,अशावेळी परिचारिकाच आपल्याला समजून घेते.समजावून सांगते.

रूग्णांची अहोरात्र सेवा करतांना आईच्या ममतेने ती काळजी घेते.सर्व तपासण्या ,औषधे वेळच्या वेळी व्यवस्थित देते.

रात्री अपरात्री रूग्णांच्या समस्यांना त्वरित बघून डाँक्टरांना सूचित करते.

रुग्णांना आहार व्यायाम याविषयी समग्र माहिती व्यवस्थित देते.सेवा भावाचे हे अखंड व्रत ती घरच्या काळज्या विसरून समर्पण भावनेने करत असते.

तिच्या हसतमुख व प्रसन्न चेहरा,स्वच्छ नीटनेटके कपडे व कामातील शिस्तीने सगळ्यांना आपलेपणा वाटतो.रुग्ण लहान मूल असो वा थकलेला..तिची भूमिका सगळ्यांसाठी मनःपूर्वक सुश्रुषा करणं हीच असते.

या आपलेपणाच्या भावनेने नकळत मनात परिचारिकेबद्दल कृतज्ञता दाटून येते.रूग्ण खणखणीत बरा होऊन घरी जाताना आपल्याइतकाच तिलाही आनंद होतो आणि हसून आपण तिचा निरोप घेतो…

पण मनोमन या समर्पण वृत्तीला,सेवाकार्याला त्या उदात्ततेला कायम आदराने

स्मरणात ठेऊनच आपण हे अनोखे नाते जपतो ….!

~~~~~~~~~~~~

*अरुणा दुद्दलवार दिग्रस@✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा