*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लावणी*
*….प्रेमाचा पाऊस..(लावणी)*
हॅंगिग गार्डन दाखवा हो बूट हाऊस
राया पडू द्या ना प्रेमाचा हो पाऊस…
म्हणती मुंबईची मोठीच शान
एका नोटेचं मिळतया पान
मंमई बघण्याचा, लागलाय् मला हो ध्यास
राया पडू द्या ना प्रेमाचा हो पाऊस…
दोघं जोडीनं बोटीत बसू
ओठं रंगलेलं खुदूखुदू हसू
जहांगीर आर्ट गॅलरीत जाऊ
घारापूरीच्या लेण्याही पाहू
जाऊ बोटीतून झुकझुक गाडी झकास
राया पडू द्या ना प्रेमाचा हो पाऊस…,
आहे सागरतीरी ममईची मुंबा देवी
क्रॅाफर्ड मार्केटला चक्कर माराया होवी
ओबेरॅाय नि ताज नरिमन पॅाईंट छान
बसू खडकावरी विसरूया जरास भान
गिरगांव चौपाटीला भेळ ती चटपटी खास
राया पडू द्या ना प्रेमाचा थोडा पाऊस…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

