You are currently viewing भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांचे उद्या जिल्ह्यात भव्य स्वागत…..

भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांचे उद्या जिल्ह्यात भव्य स्वागत…..

बांदा ते कणकवली दरम्यान होणार जंगी स्वागत

सावंतवाडी
रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार निलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे उद्या गुरुवारी जिल्ह्यात प्रथमच आगमन होत आहे. या निमित्त जिल्हा भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे जिल्ह्यात भव्य स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब व भाजपचे लोकसभा मतदार संघ सचिव विशाल परब यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
भाजपा सचिव निलेश राणे यांचे गुरुवारी सकाळी गोव्यातून आगमन होणार असून सकाळी ९ वाजता बांदा, ९.१५ वाजता खामदेव नाका, १० वाजता सावंतवाडी शहर, १०.३० वाजता कुडाळ व ११ वाजता कणकवली येथे भव्य स्वागत होणार आहे. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी संजू परब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा