You are currently viewing कासारटाका देवस्थान परिसरात “कोकण वाईल्डलाईफ” कडून स्वच्छता मोहीम…

कासारटाका देवस्थान परिसरात “कोकण वाईल्डलाईफ” कडून स्वच्छता मोहीम…

मालवण

प्राण्यांसाठी काम करणाऱ्या मालवण येथील “कोकण वाईल्डलाईफ रेस्क्यू फोरम” च्या माध्यमातून कासारटाका देवस्थान परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.यावेळी मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या वेगळ्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील श्री देव कासारकाटा महापुरुष देवस्थान हे नवसाला पावणारं देवस्थान म्हणुन प्रसिद्ध आहे.येथे वर्षाला लाखो भाविक नवस करण्यासाठी दाखल होतात.आणि तो नवस पुर्ण झाल्यावर त्या ठिकाणी जेवण बनवुन नैवेद्य दाखवला जातो अशी ईथे प्रथा आहे. या ठिकाणी पार्ट्या पण राजरोस पणे चालु असतात. पण यातुन निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट न लावता ते परस्पर निघुन जातात.विशेष करुन या कचऱ्यात प्लास्टिक पत्रावळी, द्रोण, ग्लास पाण्याच्या बाटल्या, मद्याच्या बाटल्या ईथेच वर्षानुवर्षे तशाच पडुन असतात. यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो, याचं गांभीर्य लक्षात घेऊन सिंधुदुर्गात काम करत असलेली कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम, सिंधुदुर्ग या संस्थेने पुढाकार घेऊन हा परिसर स्वच्छ केला.
या मोहिमेत अनिल गावडे, आनंद बांबार्डेकर, वैभव अमृस्कर, महेश राऊळ, नंदु कुपकर, सिध्देश ठाकुर,  विजय कदम,  विष्णु मसगे,  दिवाकर बांबर्डेकर, दिपक दुतोंडकर आदि उपस्थित होते.
या मोहिमेस मालवण तालुक्यातील प्रसिद्ध वकिल रुपेश परुळेकर यांनी रेस्क्यु टीमचं सामाजिक कार्य बघुन विशेष सहकार्य करुन प्रोत्साहन वाढवले. मागिल वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त ओरस मुख्यालय परिसरातील देशाची शान असणारे हाँकर हंटर विमान आणि परिसर या संस्थेने स्वच्छ केला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा