You are currently viewing दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी जिल्हा सैनिक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे हयातीचा दाखला सादर करावे

दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी जिल्हा सैनिक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे हयातीचा दाखला सादर करावे

दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी जिल्हा सैनिक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे हयातीचा दाखला सादर करावे

सिंधुदुर्ग

 जिल्ह्यातील दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांना जिल्हा सैनिक कार्यालय, सिंधुदुर्ग यांचेकडुन दरमहा अनुदान अदा करण्यात येते. या लाभार्थी हया वयोवृध्द असल्याने शासनाच्या नियमानुसार वर्षातुन प्रत्येक सहा महीन्याने (दिनांक ३१ मे ते दिनांक ३० नोव्हेंबर) या कालावीध हयातीचे दाखले घेऊनच अनुदान अदा करण्याचे निर्देश आहेत.

तरी दुसऱ्या महायुध्दातील पात्र माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी दरवर्षीप्रमाणे त्या हयात असल्याबाबतचा दाखला संबंधित बँक/सरपंच/ग्रामसेवक यांचेकडुन सही व शिक्यासह प्राप्त करुन घेऊन त्यासोबत माजी सैनिक विधवा पत्नी ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्डच्या छायांकीत प्रती व ०२ स्वतःचे फोटो या कार्यालयात २० मे २०२५ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

हे दाखले दिलेल्या मुदतीत या कार्यालयास प्राप्त न झाल्यास दिनांक ०१ जुन २०२५ पासुन त्यांचे मासिक अनुदान दाखला प्राप्त होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र- ०२३६२-२२८८२०/९३२२०५१२८४ वर संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा