You are currently viewing मालवणच्या शितल परुळेकर यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान…

मालवणच्या शितल परुळेकर यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान…

मालवणच्या शितल परुळेकर यांना “आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान…

मालवण

तालुक्यात १९ वर्षे कार्यरत असलेल्या शितल परुळेकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नुकताच वितरित करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अनिल पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. कमळकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील मालवण तालुक्यातून उपक्रमशील, उच्च विद्याविभूषित, अभ्यासू व प्रतिभासंपन्न शिक्षिका तथा मुख्याध्यापिका शितल परुळेकर यांची निवड करण्यात आली. त्यांनी गेली सतरा वर्षे मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी शाळेत मुख्याध्यापक म्हणून गुणवत्ता व लोकसहभाग यासाठी उत्कृष्ट, आदर्श काम केले. त्यानंतर १ वर्ष पेंडूर खरारे शाळेत ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा, ज्ञानी मी होणार उपक्रमाद्वारे शाळेने जिल्हास्तरीय यश संपादन केले. सध्या त्या बदलीने आंबोली कामतवाडी शाळेत शिक्षणसेवा देत आहेत. त्यांनी विविध स्पर्धा परीक्षा व स्कॉलरशिप परीक्षांमध्ये मुलांना भरघोस मार्गदर्शन करून जिल्हा व राज्यस्तरावर यश प्राप्त करून दिले आहे. त्यांनी अनेक जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पुरस्कार संपादित केले आहेत. त्यांनी लोकसहभागातून १० लाख रूपये खर्चुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली डिजीटल शाळा काळसे बागवाडा व तिसरी आयएसओ मानांकित शाळा करण्याचा मान मिळविला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थांतून कौतुक होत आहे. तसेच शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष संतोष पाताडे, महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे अध्यक्ष गणेश नाईक, कुडाळ शिक्षक भारती अध्यक्ष विनेश जाधव यांनी अभिनंदन केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous article
मसुरे-डांगमोडे येथे अंमली पदार्थ मुक्त अभियानाची जनजागृती फेरी…
Next article
भंडारी महाविद्यालयाच्या रील्स स्पर्धेत सिद्धेश चव्हाण व दीपक जानकर प्रथम..

Breaking Malvani

RELATED ARTICLES
कोकणातील ताज्या बातम्या
कोलगाव येथील आयटीआयच्या परिसरातील झाडांना आग….
May 4, 2025
कोकणातील ताज्या बातम्या
सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या घरात चोरी..
May 4, 2025
कोकणातील ताज्या बातम्या
ओटवणे येथील तरुणाचा शेत विहिरीत आढळला मृतदेह…

प्रतिक्रिया व्यक्त करा