You are currently viewing महादेवाचे केरवडे येथे १९ मे रोजी जिल्हास्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

महादेवाचे केरवडे येथे १९ मे रोजी जिल्हास्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

*महादेवाचे केरवडे येथे १९ मे रोजी जिल्हास्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन*

*शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे मार्फत आयोजन*

महादेवाचे केरवडे येथील प्रसिद्ध श्री सिद्ध महादेव मंदिर यात्रे निमित्ताने १९ मे २०२५ रोजी शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे मार्फत खुल्या जिल्हास्तरीय एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर स्पर्धा ही दोन गटात भरविण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय खुला गट आणि माणगाव खोरे मर्यादित खुला गट
जिल्हास्तरीय खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक ५०००₹ व ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक ३०००₹ व ट्रॉफी, तृतीय पारितोषिक २०००₹ व ट्रॉफी असे ठेवण्यात आलेले आहे. आणि माणगाव खोरे मर्यादित खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक २०००₹ व ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक १५००₹ व ट्रॉफी, तृतीय पारितोषिक १०००₹ व ट्रॉफी असे ठेवण्यात आलेले आहे.
सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
सदर स्पर्धा ही कुडाळ तालुक्यातील श्री सिद्ध महादेव मंदिर, महादेवाचे केरवडे येथे सोमवार दिनांक १९ मे २०२५ रोजी रात्रौ ठिक ७.०० वाजता होणार असून सर्व स्पर्धेकांना प्रवेश विनामूल्य आहे. या स्पर्धेसाठी १७ मे २०२५ पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे.
स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी स्पर्धा संपल्यानंतर लावण्यात येईल त्याचवेळी बक्षीस वितरण करण्यात येईल. स्पर्धेसाठी नोंदणी व माहितीसाठी गणेश नाईक – ९८६०२५२८२५, ९४२२२६३८०२, सुहास सावंत – ९४२०८८८८१३
संपर्क साधावा असे आवाहन शिवतेज ग्रुप मार्फत करण्यात आलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा