समाज प्रबोधनाच्या चळवळीतील अभ्यासू व्यक्तीमत्व आणि प्रभावी नेतृत्व -रमाकांत जाधव यांना वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा!
वयाच्या अगदी 19 ते 20 व्या वर्षीच कॉलेज जीवनात सार्वजनिक क्षेत्रात कार्यकर्त्याच्या भुमिकेत उतरलेले रमाकांत जाधव सर हे आज तब्बल
37 वर्षे आंबेडकरी चळवळीत सक्रीय कार्यकर्ता ते नेतृत्व अशी भुमिका बजावत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा समग्र परिवर्तनाचा विचार आत्मसात करत तळागाळातील जनतेला प्रबोधनाच्या माध्यमातून विचार सांगणारे एक अभ्यासू व्यक्तीमत्व,शांत,संयमी आणि एक निष्ठावंत नेतृत्व 37वर्षापूर्वीच कार्यकर्त्याच्या रूपात उदयास आले, सर्वांचं लाडकं नेतृत्व असलेल्या रमाकांत जाधव यांनी डॉ.बासाहेब आंबेडकर यांनी संकल्पित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय चळवळीला जिल्ह्यात रचनात्मक आणि गतिमान नेतृत्व दिले,या चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे,याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम.रामदास आठवले यांचे निकटवर्तीय,विश्वासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची तालुक्यात जिल्ह्यात ओळख आहे,आज ते राज्य पातळीवर राज्य सहसचिव म्हणून कार्यरत आहेत.
डॉ.बाबासाहेबांच्या स्वप्नातील आदर्श समाज निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षणाची आणि नैतिकतेची आवश्यकता आहे,या त्यांच्या विचारांना प्रमाण व केंद्रबिंदू मानून रमाकांत जाधव हे व्यक्तीमत्व तळमळीने निस्वार्थी वृत्तीने आजही खेड्यापाड्यात कार्यरत आहेत,जनतेच्या न्यायहक्कासाठी लोकशाही मार्गाने लढत जिल्ह्यतील अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले,त्यामुळेच हे नेतृत्व विश्वसनीय आणि लोकप्रिय बनले.दोडामार्ग तालूक्यातील माटणे या छोट्याशा खेडेगावात सामान्य कुटुंबात जन्मलेले रमाकांत सर आदर्श जीवन जगत आले,आजही ते आपल्या अभ्यासू वृत्तीने आणि प्रभावी वक्तृत्वाने समाजमन जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कार्यरत असलेल्या बाबासाहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या पत्नी ज्योती जाधव आज दोडामार्ग च्या नगरसेविका बनल्या ही त्यांच्या प्रामाणिक,निस्वार्थी आणि त्यागाची पोचपावती म्हणावी लागेल,राजकीय सत्तेतील प्रवास सुरू करून दाखविणे एक यशस्वी लोकप्रतिनिधी बनणे हे त्यांच्या समोरील आव्हान होते,त्याची दखल आठवले साहेबांनी घेऊन ज्योती मॅडमचा सत्कार केला,हा त्यांच्या जिवनातील एक आनंदाचा क्षण म्हणावा लागेल,
कौटुंबिक आयुष्य ते आज यशस्वीरित्या जगत असले तरी त्यांनी हे शुन्यातून निर्माण केले आहे,संघर्षमय आणि कष्टमय जीवन ते जगले हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही,कौटुंबिक आणि सार्वजनिक जीवनात अनेक चढ-उतार त्यांनी पाहिले आहेत, चळवळीतून कठीण प्रसंगी मागे हटले नाही हा त्यांचा गुण आजच्या नव्या पिढीतील युवा कार्यकरर्त्यांना प्रेरणादायी असा ठरेल.त्यांच्या वैयक्तीक जीवनातील सुखी संसारातील मंगलपरिणय हा क्षण आनंदमय असला तरी या क्षणाला 30 वर्षे पूर्ण होत आहे.त्यांच्या या सुखी परिवाला तसेच त्यांच्या 5 मे 2025 रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख -लाख मंगलमय शुभेच्छा!
