*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आरवली तीर्थक्षेत्री वेतोबाचे ध्यान*
भोळ्या भक्तांच्या अंतरी
रांगेत श्रद्धेत उभा |
देव वेतोबा संयमी
कृपाळू शांतीत उभा ||१||
जसा विटेवरी उभा
सखा पांडुरंगी शोभा |
श्रद्धा दिव्यत्वाचा गाभा
माझ्या वेतोबाची शोभा ||२||
अनंत नेत्री वेतोबा
कृपा कटाक्षे पाहशी |
संकटहारी दयाळा
भक्तजनाशी पावशी ||३||
श्रद्धा सावलीने त्याच्या
ज्ञान प्रकाशात आलो |
आरवली वेतोबाच्या
तीर्थक्षेत्री एक झालो ||४||
कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता.- वेंगुर्ला,
जि.- सिंधुदुर्ग, राज्य – महाराष्ट्र.

