कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; १४० रुग्णांनी केली मोफत आरोग्य तपासणी
देवगड
श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर आणि कॅन्सर पेशंट अँड असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन शुक्रवार दोन मे रोजी कुणकेश्वर मंदिर भक्तनिवास या ठिकाणी केले होते या शिबिराचे उद्घाटन श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सौ नीता मोरे कार्यकारी संचालिका सीपीएस मुंबई,सौ मीनल परब,डॉ संजय घिल्डियाल,डॉ सतीश काणेकर,डॉ रचना मेहरा,डॉ वीणा बोरकर डॉ शुभा मौदगल,श्री रवींद्र सरनाईक,सौ राजेश्वरी बुद्धरपु,सौ कृषिका संकपाळ, सौ नूतन जाधव, सौशोभा चिगमेटी,श्री राम धाडवे,श्री दीपक तिर्लोटकर, श्री जयंत दांडेकर,डॉ विद्याधर तायशेटे,डॉ उमेश पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश वाळके, खजिनदार उदय पेडणेकर, सचिव हेमंत वातकर, सदस्य संतोष लाड ,महेश जोईल, संजय वाळके ,दीपक घाडी, मंगेश पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष लब्दे,संजय आचरेकर, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर आदी उपस्थित होते.
या शिबिरात कर्करोगावरील विविध मूलभूत तपासण्या रक्त तपासणी, कान नाक घसा तपासणी,रक्तदाब (ब्लडप्रेशर) आणि फुफ्फुसे तपासणी, स्त्रीरोग स्त्रीस्तन कर्करोग तपासणी, सर्जिकल तपासणी आधी तपासण्या या शिबिरामध्ये करण्यात आल्या.सुमारे १४० रुग्णांनी आरोग्याची तपासणी केली.श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने रुग्णांसाठी सर्व सेवा सुविधा औषधोपचार मोफत करण्यात आले.
