You are currently viewing विधानसभा मतदारसंघातील रुग्णांच्या सेवेसाठी महाराष्ट्र व सिंधुदुर्ग दिनाचे औचित्य साधून श्री. केसरकर यांच्या हस्ते १३ रूग्णवाहीका प्रदान

विधानसभा मतदारसंघातील रुग्णांच्या सेवेसाठी महाराष्ट्र व सिंधुदुर्ग दिनाचे औचित्य साधून श्री. केसरकर यांच्या हस्ते १३ रूग्णवाहीका प्रदान

विधानसभा मतदारसंघातील रुग्णांच्या सेवेसाठी महाराष्ट्र व सिंधुदुर्ग दिनाचे औचित्य साधून श्री. केसरकर यांच्या हस्ते १३ रूग्णवाहीका प्रदान

सावंतवाडी

मला निवडून आणण्यासाठी सावंतवाडी सोडली असं मित्रपक्षाच म्हणणं आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मतदारसंघात येऊन मला निवडून आणणार असं सांगितलं होतं. ही माझ्यावर असलेली ईश्वरी कृपा आहे. त्याच्या कृपेनं मला पुनर्जीवन मिळालं असून ते मी जनतेसाठी समर्पित करत आहे असं विधान माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांनी केलं. विधानसभा मतदारसंघातील रुग्णांच्या सेवेसाठी महाराष्ट्र व सिंधुदुर्ग दिनाचे औचित्य साधून श्री. केसरकर यांच्या हस्ते १३ रूग्णवाहीका प्रदान करण्यात आल्या. बॅ. नाथ पै सभागृहात हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

श्री. केसरकर म्हणाले,राजकारण हे लोकांसाठी असतं, ते स्वतःसाठी नसतं. मत मिळावी म्हणून चार ऍम्ब्युलन्स आणून चार हजार लोक गोळा करणारी लोकं आम्ही बघितलीत. मात्र, आम्ही याआधी ९ रूग्णवाहीका दिल्या होत्या. ८० टक्के समाजकारण हा विचार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने गावागावात रुग्णवाहिका पोहचल्या होत्या. शिवसेना म्हणजे सामाजिक कामात अग्रेसर असणारी संघटना आहे. काहीजण टीका करतात. पण, माझ्या एका फोनवर १३ ऍम्ब्युलन्स व हर्ष व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत आहे. येथील रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळावी यासाठी माझा प्रयत्न आहे. राजकारण हे निवडणूकांपूरत असतं. पदाला चिकटून रहाणारा मी नाही. यापुढे निवडणूक लढण्याची इच्छा नाही. काही दिवसांपूर्वी मला पूनर्जीवन मिळालं. हे जीवन मी जनतेसाठी समर्पित करत आहे असं मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले. तसेच रूग्णवाहिका दिल्याबद्दल अंबर तिंबलो यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी आम. केसरकर यांच्याहस्ते युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी, अभिनव फाउंडेशन,गावतळवाडी विकास मंडळ रेडी, गावठणवाडी कलाक्रिडा मंडळ ओटवणे, मलबार नेचर क्लब आंबोली, स्वराज्य मंडळ कलंबिस्त, श्री साईबाबा प्रतिष्ठान आजगाव, साटम महाराज मंडळ निरवडे, मातोश्री मंडळ वेंगुर्ला, कोकण गर्जना वेंगुर्ला, ग्रामविकास वेंगुर्ला, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दोडामार्ग, महामाया नवरात्रोत्सव मंडळ पिकुळे, बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळ सावंतवाडी आदींना या रूग्णवाहिका सुपुर्द करण्यात आल्या.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हाप्रमुख अँड निता सावंत-कविटकर, सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख बबन राणे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, नितीन मांजरेकर, गणेशप्रसाद गवस, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, प्रेमानंद देसाई, विद्याधर परब, देव्या सुर्याजी, गजानन नाटेकर, परिक्षीत मांजरेकर, हर्षद डेरे, विनोद सावंत, प्रतिक बांदेकर, दिपाली सावंत, सरपंच योगेश तेली आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, जनतेची काळजी घेणारा आमदार म्हणजे दीपक केसरकर आहेत. यापूर्वी दहा रूग्णवाहीका मतदारसंघात दिल्या होत्या. आज आणखीन १३ रूग्णवाहीका देण्यात येत आहे. सिंधुरत्न योजनेतून शेतकरी, महीला बचतगट, दशावतार कलावंतांना भरघोस मदत केली आहे. मात्र, कधीही श्रेयवाद त्यांनी केला नाही. अडीच हजार कोटीची काम दीपक केसरकर यांनी मतदारसंघात केलीत. आज ग्रामीण भागात जाऊन आम्ही काम करत आहोत. खुर्चीवर बसून राजकारण करणारे आम्ही नाही असं विधान श्री. परब यांनी केल. प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी सुत्रसंचालन हेमंत खानोलकर तर आभार बाबु कुडतरकर यांनी मानले. यावेळी आबा केसरकर, नंदू शिरोडकर, सुजित कोरगावकर आदींनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा