You are currently viewing प्रा.डाॅ. रे.भ.भारस्वाडकर यांना ‘मराठवाडा भूषण ‘ पुरस्कार प्रदान.* 

प्रा.डाॅ. रे.भ.भारस्वाडकर यांना ‘मराठवाडा भूषण ‘ पुरस्कार प्रदान.* 

छ.संभाजीनगर :

सामाजिक बांधिलकीच्या भावनेने अविरत उल्लेखनिय कार्याबद्दल ज्येष्ठ गझलकार प्रा.डाॅ. रेणुकादास भगवानराव भारस्वाडकर यांना २०२५ चा “मराठवाडा भूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला. समर्थ गौरव पुरस्कार निवड समितीने हा पुरस्कार जाहीर केला होता.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज १ मे २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता संत तुकाराम महाराज सभागृह, मुकुंदनगर, छ.संभाजीनगर येथे माननिय श्री विजयअण्णा बोराडे, कृषिभूषण यांचे हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सन्मान सोहळ्यास संतकृपा सेवा प्रतिष्ठानचे श्री दत्ता ठुबे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा.डॉ.रेणुकादास भारस्वाडकर हे गझलकार, गझलगुरू म्हणून ज्ञात असून सेवाभावी वृत्तीने त्यांनी विना मोबदला अनेक गझल कार्यशाळा घेत कित्येकांना गझलेचे शिक्षण देत कितीतरी गझलकार निर्माण केले आहेत. आपल्यापाशी जे जे आहे ते दुसऱ्यांना द्यायचे अशा भावनेने सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आदर्शवत असे काम करून समाजात मानसन्मान मिळविला आहे. त्यांच्या याच आदर्श गुणांचा गौरव करत त्यांना “मराठवाडा भूषण २०२५” पुरस्कार देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा