सावंतवाडी/प्रतिनिधी : शिवसेना सिंधुदुर्ग आणि आमदार दीपक केसरकर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनी सकाळी १० वाजता सावंतवाडीतील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते तब्बल १२ रुग्णवाहिका लोकार्पण होणार आहे. तरीही सर्व आयोजकांनी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित रहावे असे आवाहन दीपकभाई केसरकर मित्रमंडळाने केले आहे.

