You are currently viewing महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र माझा

*ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार संपादक बाबू फिलिप्स डिसोजा कुमठेकर लिखित अप्रतिम लेख*

 

*महाराष्ट्र माझा*

 

मराठा नावाचे अपभ्रंश रूप महाराष्ट्र आहे. सम्राट अशोकाच्या काळात आलेल्या ह्यू एन त्संग या चिनी प्रवाशाने महाराष्ट्र असा उल्लेख केला आहे.

मराठी भाषिकांचे राज्य व्हावे म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. १०७ हुतात्म्यांचे बलिदान यासाठी झाले.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही भाषावार प्रांत रचना धोरण अवलंबून केंद्र सरकारने केल्याने झाली.

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या स्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी नेहमी आपणास प्रेरणा देते. एकूण ४०० किल्ले महाराष्ट्र भर आहेत.

महाराष्ट्रात वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट व गिरिदुर्ग असे किल्ले आहेत. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने शत्रूंना जेरीस आणले. हा झाला इतिहास.

महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे.

भारतात महाराष्ट्र हे एक प्रगतीशील राज्य आहे. आजमितीस महाराष्ट्र राज्यात ३७ जिल्हे असून ३४ जिल्हा परिषदा आणि ३५८ तालुके आहेत.

सध्यातरी मुंबई, नागपूर, पुणे ही आंतरराष्ट्रीय विमानतळे महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहेत. नाशिक, नांदेड, औरंगाबाद (संभाजीनगर), जळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, शिर्डी ही विमानतळे देशांतर्गत वाहतूक करतात.

राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावर सह्याद्री पर्वत पसरला आहे.सह्याद्री पर्वताची लांबी सुमारे 1,600 किलो मीटर आहे. या पैकी महाराष्ट्रा मध्ये 720 किलो मीटर लांबीचा सह्याद्री पर्वत आहे. याला ‘पश्चिम घाट या नावाने ही ओळखले जाते. याची सरासरी उंची 915 ते 1,220 मी. आहे. महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते, तर दक्षिणेकडे कमी होत जाते.

महाराष्ट्र समृद्ध करणाऱ्या भीमा, गोदावरी, पवना, पंचगंगा, पाताळगंगा, इंदायणी, कोयना, कुंडलिका, तापी, गिरणा, वैनगंगा, नीरा, वर्धा, कृष्णा, पूर्णा, चंदभागा, वेण्णा, रंगावली, भातसा या कांही महत्वाच्या नद्या आहेत.

महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे.समर्थ रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत निवृत्तीनाथ, संत मीराबाई, संत मुक्ताई, संत सावता माळी, संत सोयराबाई, यासारख्या संतांची महाराष्ट्र ही जन्मभूमी, कर्मभूमी राहिली आहे.

देहू, आळंदी, कोल्हापूर, तुळजापूर, माहुर, नासिक, त्र्यंबकेश्वर, अशी अनेक तीर्थक्षेत्रे आहेत.

महाराष्ट्र राज्यात जागतिक वारसा ठरलेली तीन लेणी आहेत कैलास, वेरूळ, घारापुरी. याशिवाय, कार्ले, भाजे, नाडसूर, गांधार पाले, लेण्याद्री, ठाणाळे, कुडा, आगाशिव अश्या लहानमोठ्या लेण्या आहेत.

महाराष्ट्रात मँगॅनीज, लोह,चुनखडी ,बॉक्साइट, डोलोमाईट, क्रोमाइट, कायनाईट व सिलिमनाईट अशी विविध खनिजे आहेत.

महाराष्ट्र राज्यात ६० भाषा बोलल्या जातात तर ४० बोलीभाषा, आदिवासी भाषा बोलल्या जातात.

गोंड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया आदी बोलीभाषा प्रमुख आहेत. गोंडी व भिल्ली या पोटभाषा अतिप्राचीन आहेत. गोंडी पोटभाषा महाराष्ट्रात प्राधान्याने बोलली जाते.

महाराष्ट्रात गोड चवी सामान्यतः तांदूळ आणि गुळापासून तयार केल्या जातात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, भाजीपाला, मसूर, हंगामी फळे आणि भाजीपाला या राज्यातील मुख्य अन्नधान्यांचा समावेश आहे. तसेच, शेंगदाणे कोकम, आमसूल, चिंच, कच्चा आंबा आणि नारळ हे काही खास पदार्थ आहेत जे पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जातात.

पिठले भाकरी, सोल कढी, कोथिंबीर वडी, आलुवडी, मिक्स व्हेज कोल्हापुरी, साबुदाणा वडा आणि खिचडी, पोहे, बटाटा भाजी, आमटी, तांबडा रस्सा, पंधरा रस्सा, भरली वांगी हे महाराष्ट्रीयन घरातील काही पारंपारिक पदार्थ आहेत.तर मोदक, पुरण पोळी, श्रीखंड, आम्रखंड हे काही प्रसिद्ध गोड पदार्थ आहेत .

कवी यशवंत हे महाराष्ट्राचे राजकवी आहेत. पिवळ्या पायाचे हिरवे कबूतर-हरियाल किंवा हराली राज्य पक्षी आहे. महाराष्ट्राचा राज्य मासा सिल्व्हर पापलेट आहे. भीमाशंकर जंगलात आढळणारा शेकरू हा राज्य प्राणी आहे.

प्रत्येक मराठी माणसाने अभिमान बाळगावा असा आपला महाराष्ट्र आहे. “गर्जा महाराष्ट्र माझा “हे महाराष्ट्र राज्याचे गीत झाले आहे.

 

-बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

हिमगौरी बिल्डिंग २१,सेक्टर २१,

स्कीम १० यमुनानगर निगडी पुणे-४११०४४

मो. 9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा