You are currently viewing छोटेसे बाळ

छोटेसे बाळ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी प्रा. सत्यवान घाडी लिखित अप्रतिम बालगीत*

 

*छोटेसे बाळ*

***********

 

छोटेसे बाळ आमचे खोड्या करी भारी

हाती घेता आनंदाने टून टून उड्या मारी।।धृ।।

 

इवल्या इवल्या हातांनी कसरत करी

गरा गरा डोळे फिरवूनी गंमत करी

पाहताना वाटते जादू करते भारी

हाती घेता आनंदाने टून टून उड्या मारी।।धृ।।१।।

 

पायातील पैजण छूम छूम वाजती

बाळाच्या कानातील डूल तालात झुलती

डोईवर केसांची शेंडी दिसते न्यारी

हाती घेता आनंदाने टून टून उड्या मारी।।धृ।।२।।

 

उभे राहता येईना धपकन पडे

हिरमुसले होऊन चटकन रडे

गुदुगुदु करता निघे हास्याची स्वारी

हाती घेता आनंदाने टून टून उड्या मारी।।धृ।।३।।

 

तोंडात बाळाच्या हात वाटते बासरी

वाजवितो पावा जणू देव तो मुरारी

मोत्याची माळ गळ्यात दिसतसे न्यारी

हाती घेता आनंदाने टून टून उड्या मारी।।धृ।।४।।

 

🐇🐇🐇🐇🐇🐇🐇🐇🐇🐇🐇🐇

*रचनाकार:-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी.

*गाव:-* किंजवडे,घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.

*ठाणे:-* दिवा.

🦚🌸🦚🌺🦚🪷🦚🌹🦚🌸🦚

प्रतिक्रिया व्यक्त करा