You are currently viewing उद्या सावंतवाडीत मोबाईल क्षेत्रात दर्जेदार सेवा देणाऱ्या “डॉ फोन” शाखेचे उद्घाटन

उद्या सावंतवाडीत मोबाईल क्षेत्रात दर्जेदार सेवा देणाऱ्या “डॉ फोन” शाखेचे उद्घाटन

सावंतवाडी :

मोबाईल क्षेत्रात दर्जेदार सेवा देणारी कोकणातील पहिली इलेक्ट्रॉनिक कंपनी असलेल्या “डॉ फोन” या मोबाईल स्मार्ट इलेक्ट्रॉनिक शोरूम व सर्विस सेंटरचे उद्घाटन उद्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथे होणार आहे.

सावंतवाडीतील युवा उद्योजक मिहीर मठकर यांच्या माध्यमातून गांधी चौक येथील दत्तात्रय निवास या अपार्टमेंटमध्ये ही शाखा सुरू करण्यात आली आहे. तळवडे येथे मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर या शाखेचे दुसरे दालन आता सावंतवाडी सुरू होत आहे. या ठिकाणी नामांकित कंपन्यांचे मोबाईल आणि स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.

आयफोन, सॅमसंग, रियलमी, विवो, ओप्पो यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्ससोबतच मोटोरोला, गुगल पिक्सल, वनप्लस, बोट, फायर-बोल्ट, नॉइज, डेल, असुस आणि लेनोवो यांसारख्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी येथे मिळेल.तरी या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन एस अँड टी हब प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मिहीर मठकर, संस्थापक पंकज सावंत, संचालक स्नेहा सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा