You are currently viewing बांदा केंद्र शाळेतील उन्हाळी छंदवर्गाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

बांदा केंद्र शाळेतील उन्हाळी छंदवर्गाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

*बांदा केंद्र शाळेतील उन्हाळी छंदवर्गाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद*

*बांदा*-

विद्यार्थ्यांच्या संकलित चाचणी परीक्षा संपल्यावर शाळेत आयोजित करण्यात आलेल्या छंदवर्गाला पीएम श्री बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास व्हावा यासाठी २६ते २९एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या छंदवर्गाचे उद्घाटन शाळेत वर्षभर नियमित उपस्थित राहिलेला दिव्यांग विद्यार्थी यशवंत‌ वाघमारे याच्या हस्ते करण्यात आले. या छंदवर्गात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे व सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
या छंदवर्गात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होणेसाठी गोट्या, भोवरा, लगोरी, विटीदांडू,टायर पळवणे ,लंगडी असे विविध पारंपारिक खेळ, रोबोटिक्स साहित्य बनविणे,सायकल चालवणे, क्रिकेट प्रिमियम लिग, आमरस खाद्यपदार्थ बनवणे, शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग असे विविध उपक्रम घेण्यात आले. छंदवर्गाच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गायन व नृत्य अशा कलांचे सादरीकरण केले.
सदर छंदवर्ग यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शांताराम असनकर, पदवीधर शिक्षक उदय सावळ, उपशिक्षक जे.डी.पाटील , रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, शुभेच्छा सावंत, स्नेहा घाडी, जागृती धुरी, मनिषा मोरे‌,कृपा कांबळे, सुप्रिया धामापूरकर‌ यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा