You are currently viewing ना.नितेश जी ठरणार मच्छीमारांसाठी देवदूत

ना.नितेश जी ठरणार मच्छीमारांसाठी देवदूत

*ना.नितेश जी ठरणार मच्छीमारांसाठी देवदूत*

मालवण

नामदार नितेश राणेंनी कोकणच्या मच्छिमारांसाठी *”कोस्टल स्टेट फिशरीज समिट”* मध्ये काही महत्त्वाच्या मागण्या केल्या केंद्रीय मंत्री राजीव रंजनजी सुद्धा त्यांच्या अभ्यासू भाषणांमुळे भारावून गेले. त्यातील काही मुद्दे –

१) सर्वप्रथम त्यांनी आपल्या मंत्रिपदाचे ध्येय स्पष्ट करताना मच्छीमारी व्यवसाय वाढ, मच्छीमारांचे आयुष्य उंचावणे आणि *कोस्टल सिक्युरिटी* हेच आहे याची ग्वाही केंद्रीय मंत्र्यांना दिली. (कोस्टल सिक्युरिटी म्हणजे मिरकरवाडी आणि दापोली दौरा अशी दोन उदाहरणे ही त्यांची सुरूवात असं मला वाटतं)
Visionary leaders execute strategies, You deserve it !

२) *LEd मच्छीमारी बद्दल नितेशजीं आक्रमक*
परराज्यातून येणाऱ्या एलईडी मच्छीमारी आणि त्यांच्या त्रासाबद्दल कोकणी माणसाच्या यातना केंद्रीय मत्स्यमंत्र्यांसमोर, अधिकारीं समोर मांडण्यात आल्या. त्यासाठी असलेल्या सूचना आणि गाईडलाईनचे पालन व्हावे असे प्रमुख मागणी त्यांनी या आपल्या भाषणात केली. पारंपारिक मच्छीमारी आणि त्यांच्या अडचणी आज देश पटलावर चर्चेत आल्या. एलईडी मच्छीमारीवर संपूर्ण बँन आणावा यासाठी देशपातळीवर निर्णय घेण्यात यावा अशी प्रमुख मागणी केली. धन्यवाद नितेशजी! भविष्यात आपण त्यातून मार्ग काढणार आहात आणि स्थानिक मच्छीमारांसोबत पालकमंत्री आहेत याची जाणीव भविष्यात सर्वांना ठेवावी लागेल.

३) *मच्छीमारांसाठी पंतप्रधान घरकुल योजना*

शासनाने गोरगरीब जनतेसाठी घरकुल योजना देशभर राबवली परंतु मच्छीमार सीआरझेड व इतर कायद्याच्या कचाट्यात अडकून या योजनेपासून दूरच राहिला आहे. शासनाने या संदर्भात मच्छीमारांना दिलासा देत त्यांना या योजनेपासून घरकुलांपासून वंचित राहू नये यासाठी तरतूद करावी अशी प्रमुख मागणी केली. सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील सर्व मच्छीमारांना याचा फायदा होईल.

यासोबतच स्थानिक मच्छीमारांना जे समुद्रकिनारी राहतात त्यांना वारंवार शासनाकडून नोटीस जातात ज्यामुळे त्यांचे जनमान अतिशय तणावपूर्ण जगावे लागते यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी देशपातळीवर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी माननीय मंत्री महोदय यांनी केली.

Creativity requires input, seems to be gathering material

४) नुकताच मत्स्य व्यवसायाला मत्स्य शेतीचे स्वरूप देण्यात आले याची माहिती केंद्रीय मंत्र्यांना देत देशभरात आता या धर्तीवर मत्स्य शेती चा कसा विकास होईल याचे उदाहरण पहिल्यांदा महाराष्ट्राने देशासमोर ठेवले. नितेश राणे या खात्याचे मंत्री आहेत याचा कोकणी माणूस म्हणून आम्हाला अभिमान राहील.
Be proud of what you choose to create!

५) आंध्र प्रदेश ओरिसा पश्चिम बंगाल कर्नाटक आणि गुजरात यांच्यामध्ये ५७% मासेमारी होते यापुढे महाराष्ट्राचं नाव यांच्यासोबत अग्रक्रमाने घेतले जाईल याची ग्वाही त्यांनी आपल्या भाषणात दिली.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून संभाव्य काळातील विकासाचे व्हिजन एका चित्रफिती मधून सादरीकरण केले.
कोकणी बांधवांना आजचा क्षण अभिमानास्पद आहेच परंतु देवेंद्रजीनां सुद्धा आज अभिमान वाटावा कार्य मा. नितेशजींकडून घडत आहे

Hats off Nitesh Sir !

Whatever you did today was the way it was meant to be. Be proud of you !

*श्रीकृष्ण परब*
भाजप सोशल मीडिया सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा