जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून ३० तारखेला सिंधुदुर्गात गुंतवणूक परिषद..
नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती; इच्छुक असलेल्या व्यक्तींशी सामंजस्य करार करणार…
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून ३० तारखेला सिंधुदुर्ग येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजन करण्यात आली आहे. या परिषदेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज येथे दिली. दरम्यान या परिषदेच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील परिषदांमध्ये २६५२ सामाजिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. त्यातून २६८० कोटीची गुंतवणूक प्रस्तावित आहे. त्यातील २ लाख ३१ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
श्री. पाटील आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री.पाटील पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी, राज्यातील उत्पादने यांची निर्यातवृध्दी तसेच औद्योगिक विकासाकरीता गतवर्षी फेब्रुवारी-मार्च, २०२४ दरम्यान जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली. सर्व जिल्हयांतील परिषदांमध्ये २६५२ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होऊन २६ हजार ६८० कोटी रुपयांची गुंतवणुक प्रस्तावित झाली होती. तसेच यामुळे २ लाख ३१ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित असल्याचे दिसून आले आहे, असे सांगितले.

