१८ वर्षांखालील मुले-मुलींसाठी २७ एप्रिलपर्यंत नाव नोंदणी
कणकवली : जोश बेवरटेक लि. कंपनी पुरस्कृत मे. चेतना टेडर्स, मालवण-कट्टा व कणकवली येथील श्री चेस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने २९ एप्रिल रोजी येथील लक्ष्मी विष्णू हॉल येथे जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, मेडल व चषक देण्यात येणार असून सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेत १८ वर्षांखालील मुले-मुली सहभागी होऊ शकतात. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे २७ एप्रिलपर्यंत श्रीकृष्ण आडेलकर (९४२२३८१९४९) यांच्याकडे द्यावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

