You are currently viewing ती स्त्री…

ती स्त्री…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ती स्त्री…*

 

दाणे पाखडून ती

सुख बाजूला काढते

खडे वेदनांचे जणू ती

हळूवार चाळते

 

दु:ख निवडुणू ती

गाऱ्हाणे मांडते

व्यथा दळता दळता

ती कर्माशी भांडते

 

पिट सावरता आवरता

जणू आनंद ती भरते

भाकर थापता थापता

भुक गहिवरून येते

 

भोग कर्माचे भोगून

चुल धगधग पेटते

श्वास कष्टाचा घेऊन

जखमा ती जाळते

 

घाव‌ पदरात झाकून ती

हसु चेहऱ्यावर आणते

सुख दुःखाचं कालवण

ती गोड करून भरवते

 

यातना जात्यावर दळून

बोल खडीसाखरेचे बोलते

तिचा मिटभाकरीचा संसार

गुण्यागोविंदाने नांदते

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा