*ज्येष्ठ लेखिका कवयित्री स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
पंढरीचा राजा!
💐💐💐💐💐
देऊळी उभा हा राजा पंढरीचा,
नीलकांती शांत, परी स्रोत तेजाचा
दिव्यतेजी प्रगटे, पुतळा चैतन्याचा
हा शाम सावळा वर्ण खुले तयाचा
ज्ञानाचा रत्नाकर, परी निरहंकार
भोळ्या, भक्तांना नित्य वाटे़आधार
देऊळी राऊळी त्या नामाचा गजर
माझा हा देव अदृश्य फिरेविश्वंभर
मस्तकी तयाच्या शिवपिंडी प्रतीक
मुकुटीझ़ळके हरिहराचे तेजरुपक
गंधरुपे भाळावर शोभे तेजदिव्यक
मकरकुंडले कानी, खुलता लोलक
तुळशीहार गळा, कौस्तुभाचेपेंडण
भृगू ऋषींचा प्रहार उमटे वक्षी व्रण
नाभीकमळीब्रह्मदेवाचेउगमस्थानरत्नजडितमेखलाभुषवे कटिस्थान
उजव्याहस्तीकमल,शंखवामहस्ती
शोभेपीतांबररेशम उभीकृष्णकाठी
मुक्तीकेशीचीक्षमाबोटेपाऊलीउठी
पुंडलिकाच्यावीटेवरीउभाजगजेठी
विठ्ठल मूर्ती च्या खुणांवरून
काव्यरचना
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
विरार

