You are currently viewing गाबीत समाजाचा रविवारी भांडुपला स्नेहमेळावा !

गाबीत समाजाचा रविवारी भांडुपला स्नेहमेळावा !

मुंबई –

गाबीत समाज मुंबई, आणि गाबीत समाज विकास मंडळ भांडुप पश्चिम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समाजबांधवांचा कौटुंबिक स्नेहमेळावा यानिमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ रविवारी दि. २७ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४ ते १० या वेळेत पराग विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज तलाव, भांडुप (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अध्यक्ष सुजय धुरत, सरचिटणीस गणपत मणचेकर यांनी आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा