You are currently viewing परतीचा प्रवास

परतीचा प्रवास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री मोनिका बासरकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*परतीचा प्रवास*

 

असता समजा आयुष्याचा परतीचा प्रवास ,

किती बर झालं असतं ,

गाठून पुन्हा मागचा टप्पा आयुष्य पुन्हा सुधारलं असतं ||

 

कटू आठवणी साऱ्या पुसून टाकल्या असत्या,

नव्याने बीजा आशेच्या पुन्हा पेरल्या असत्या,

पोखरणाऱ्या चिंतांची होळी पेटविली असती,

शोधली असती पुन्हा गमावलेली संधी ||

 

असता समजा आयुष्याचा परतीचा प्रवास ,

डांबून टाकलेल्या अश्रूंना करून दिली असती मोकळी वाट ,

उतरवून टाकला असता भंगलेल्या अपेक्षांचा भार ||

 

असता समजा आयुष्याचा परतीचा प्रवास ,

बांधला असता पुन्हा तुटलेल्या स्वप्नांचा बांध ,

दूर लोटून नकारात्मकता केली असती पुन्हा जोमाने सुरुवात ||

 

कदाचित

असता आयुष्याचा परतीचा प्रवास….

 

©® मोनिका बासरकर

अंधेरी पूर्व, मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा