You are currently viewing संकेश्वर-बांदा महामार्ग सावंतवाडीतूनच जाणार

संकेश्वर-बांदा महामार्ग सावंतवाडीतूनच जाणार

संकेश्वर-बांदा महामार्ग सावंतवाडीतूनच जाणार,

३८ लाख डांबरीकरणासाठी खर्च..

बांधकाम अधिकार्‍यांचा दुजोरा; दाणोली-बावळाट रस्त्याचे सिमेंटीकरण, मात्र दर्जा राज्यमार्गाचाच…

सावंतवाडी

नियोजित संकेश्वर-बांदा हा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार आहे. नव्याने या महामार्गावर ३८ कोटी खर्च करुन डांबकरीण करण्यात आले आहे तर दुसरीकडे दाणोली-बावळाट हा रस्ता सिमेंटीकरण होत असला तरी त्याला दर्जा मात्र राज्यमार्गाचाच राहणार आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या महामार्गाचा सावंतवाडी शहरातून जाणारा हा भाग राष्ट्रीय महामार्ग खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील सर्व सोपस्कार आता राष्ट्रीय महामार्ग खात्याकडुन करण्यात येणार आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडुन दुजोरा देण्यात आला आहे.

संकेश्वर-बांदा हा महामार्ग नेमका कोठून जाणार? याबाबत गेली अनेक वर्षे प्रश्नचिन्ह होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग सुध्दा अनभिज्ञ होता. दुसरीकडे या महामार्गाचे आजर्‍या पर्यंतचे काम पुर्ण झाले आहे. मात्र आंबोली पासून पुढे हे काम धिम्यागतीने सुरू आहे. दरम्यान बांधकामच्या अधिकार्‍यांकडुन मिळालेल्या माहितीनुसार हा महामार्ग आता राष्ट्रीय महामार्ग खात्याकडे वर्ग करण्यात आला आहे. बुर्डी पुल, सावंतवाडी शहर, इन्सुली ते बांदा अशी आखणी आणि मोजणीची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली तसेच तब्बल ३८ कोटी रुपये खर्च करुन या महामार्गावर नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा