*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
___________________________
श्री स्वामी समर्थ काव्य- वंदना काव्यपुष्प- १९ वे
__________________________
भक्तिभावाने प्रातिथा । स्वामींकडे धाव घेता । दर्शन लाभे
शांतता । अस्वस्थ मनाला हो ।। १ ।।
येता तुमच्या द्वारी । ओढ दर्शनाची अंतरी । चित्त चंचल जरी। ते स्थिर होई तवकृपे ।। २।।
माझी लेखन योजना । लिहावी श्री समर्थ काव्यवंदना ।
माझी या लेखना । आरंभ झाला स्वामी इच्छेने ।। ३ ।।
स्वामी कृपा असल्यावर । गोष्टी सुलभ- साचार ।
मज अभ्यासा आधार । स्वामींनीच केली सोय सारी ।। ४।।
प्रचिती मज कशी आली । स्वामी कृपा कशी झाली ।
लेखणी रसाळ झाली । हेचि सांगतो जन तुम्हाला ।। ५।।
नाशिक शहरी स्थिर । प्रा.डॉ.यशवंत पाटील सर ।
स्वामी भक्त हे लेखक थोर । करिती लेखन स्वामींवर ।।६।।
भक्त हे अभ्यासू,जिज्ञासू विलक्षण । प्रासादिक आहे सारे लेखन । आहे उदाहरण । स्वामी-कृपेचे हो ।। ७ ।।
श्री स्वामी समर्थ काव्य-वंदना । या माझ्या लेखना ।
साह्यभूत होण्या । स्वामीं देती प्रेरणा पाटील सरांना ।।८।।
यशवंत पाटील सरांनी पाठवली थेट । त्यांची समर्थ विषयीची सारी ग्रंथ भेट । अनुपम ही अक्षरभेट ।
मज लेखनासाठी स्वामी-प्रसाद ।। ९।।
भ्रमण गाथा समर्थांची । कहाणी स्वामींच्या कार्याची ।
भक्त प्रबोधनाची । लिहितोय काव्य-स्वरूपात हो ।।१०।।
*******************
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास ।।
___________________________
कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे – पुणे.
___________________________

