You are currently viewing शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्या कणकवलीत करणार पाकिस्तानी दहशतवाद्यांचा जाहीर निषेध

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्या कणकवलीत करणार पाकिस्तानी दहशतवाद्यांचा जाहीर निषेध

*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्या कणकवलीत करणार पाकिस्तानी दहशतवाद्यांचा जाहीर निषेध*

*शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन*

जम्मू -काश्मीरमधील पेहलगाम येथे बैसनर खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताच्या विविध भागातून आलेल्या सुमारे २६ पर्यटकांचा दुर्दैवी मुत्यू झाला असून अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.त्याविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली पटवर्धन चौक येथे उद्या गुरुवार दि. २४/०४/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता भीषण हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. याप्रसंगी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली,माजी आमदार परशुराम उपरकर,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव हे उपस्थित राहणार आहेत यावेळी शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर,तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,तालुका संघटक राजू राठोड यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा