You are currently viewing राज्यस्तरीय गुरुकुल प्रज्ञा बांदा केंद्र शाळेचे दहा विद्यार्थी चमकले

राज्यस्तरीय गुरुकुल प्रज्ञा बांदा केंद्र शाळेचे दहा विद्यार्थी चमकले

*राज्यस्तरीय गुरुकुल प्रज्ञा बांदा केंद्र शाळेचे दहा विद्यार्थी चमकले*

*बांदा*

गुरूकुल एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुरूकुल प्रज्ञा परीक्षेत पीएम श्री बांदा नं.१केंद्रशाळेतील दहा विद्यार्थ्यांनी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत चमकदार कामगिरी केली .इयत्ता दुसरीतून लक्ष्मण शिंदे राज्यात पाचवा,चंद्रकांत पावसकर याने जिल्ह्यात तिसरा व राज्यात आठवा हिमेश बांदेकर जिल्ह्यात पाचवा व राज्यात दहावा इयत्ता तिसरीतून श्रेया परब हिने जिल्ह्यात दुसरा राज्यात तेरावा, वेदांत वीर जिल्ह्यात विसावा राज्यात अडतिसावा,राघवी महाले जिल्ह्यात एकवीसावा व राज्यात एकोणचाळीसावा,सान्वी झोरे जिल्ह्यात चौतीसावा राज्यात बावन्नवा तसेच इयत्ता पाचवीतून दुर्वा नाटेकर हिने जिल्ह्यात पहिला व राज्यात सातवा,स्वरा बांदेकर जिल्ह्यात दुसरा राज्यात सोळावा
तन्वी यशवंत साईल जिल्ह्यात पाचवा राज्यात एकोणिसावा क्रमांक प्राप्त केला. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मेडल व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
बांदा केंद्र शाळेतील या यशस्वी विद्यार्थ्यांचे‌ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी अभिनंदन केले असून या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक उदय सावळ,जे.डी.पाटील, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, शुभेच्छा सावंत, स्नेहा घाडी, जागृती धुरी, मनिषा मोरे‌,कृपा कांबळे ,सुप्रिया धामापूरकर‌ यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा