*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*विषय जीवनसाथी*
..
चाले संसाराचा रथ
दोन दृढ चाकावर
एक चाक निखळता
दडपण एकावर
कसा झालास निर्दय
मला सोडून गेलास
येते खूप आठवण
होतो तुझा मला भास
वर्षे झालीत त्रेपन
साथ आपली दोघांची
कशी दिलीस सोडून
होते काहिली जीवाची
काय करावे सुचेना
तुझ्याविना करमेना
आस जीवन साथीची
मन तळमळे, राहवेना
प्रतिभा पिटके
अमरावती
