You are currently viewing पंचशील ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्यावतीने पनवेल येथे आदर्श शिक्षक शंकर जाधव यांचा गौरव

पंचशील ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्यावतीने पनवेल येथे आदर्श शिक्षक शंकर जाधव यांचा गौरव

पंचशील ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्यावतीने पनवेल येथे आदर्श शिक्षक शंकर जाधव यांचा गौरव

पंचशिल ट्रस्ट ओरोस आदर्शनगर सिंधुदुर्ग यांच्यावतीने वेगवेगळे उपक्रम साजरे होत असतात. मुंबई गोवा हायवे वर वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, देहदानाचे फॉर्म भरणे सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक या कार्यात या ट्रस्टचा खारीचा वाटा असतो. वधु-वर मेळाव्याचे आयोजन करुन बौध्द समाजातील उपवर मुला-मुलींचे जुळुन येती रेशीम गाठी या माध्यमातुन जोडीदाराची सुध्दा निवड केली जाते. असे या एक ना अनेक उपक्रम ट्रस्टच्या माध्यमातुन चालु असतात. दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे वधु-वर स्नेह मेळाव्याचे आयोजन करुन या कार्यक्रम अंतर्गत दिवंगत बलवंत शंकर खोटलेकर गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यार्थ श्री. शंकर जाधव (घोणसरी-फोंडा) यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रथम बुध्दवंदना व त्रिसरन पंचशील घेण्यात आले. त्यानंतर संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पुज्य भन्ते संघरत्न नवी मुंबई वृंदा पेंडरकर (सामाजिक कार्यकर्त्या- बांद्रा), जगदिश कांबळे (सामाजिक कार्यकर्ते- भांडुप) स्नेहलता गायकवाड (सामाजिक कार्यकर्त्या- पनवेल), दिनेश जाधव, अॅड. रीना कांबळे त्याचप्रमाणे पंचशील ट्रस्टचे अध्यक्ष समाजभुषण पुरस्कार प्राप्त, गुणवंत पुरस्कार प्राप्त आयु. संजय खोटलेकर तसेच ट्रस्टचे सर्व सभासद, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
वधु-वर मेळाव्यासाठी १० ते १५ मुले व मुली उपस्थित होत्या. या सोहळयास जगदिश कांबळे व स्नेहलता गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले व उपस्थितांना प्रबोधन सुध्दा केले. त्याचप्रमाणे आयु. शंकर जाधव यांनी सुध्दा पंचशील ट्रस्टच्या वतीने आपणाला आदर्श शिक्षक हा पुरस्कार देऊन गौरविले याबद्दल सुध्दा कृतज्ञता व्यक्त केली व उपस्थितांना त्याचप्रमाणे पंचशील ट्रस्टला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपण कायमच सकारात्मक रहा आणि आपल्या जीवनामध्ये चांगलेपणा घडवून आपलं भवितव्य उज्वल यशाकडे न्या अशा आशयाचे विचार आयु. खोटलेकर यांनी मांडले. त्यांनतर दिनेश जाधव यांनी सर्व उपस्थितांचे आभार व अभिनंदन केले. सरनेत्य गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा