You are currently viewing जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात पदभरती

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात पदभरती

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात पदभरती

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सावंतवाडी येथील सैनिकी मुलांचे वसतीगृह व माजी सैनिक विश्रामगृह यांच्या व्यवस्थापनासाठी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने मानधनवार माजी सैनिक प्रवर्गातुन/ नागरी संवर्गातून खालील अशासकीय पदे भारण्यात येणार असल्याचे सहा. सैनिक जिल्हा कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

अ.क्रपदाचे नावसंवर्गमानधन दरमहाएकुण पदे
सैनिकी मुलांचे वसतीगृह, सावंतवाडी
1सहाय्यक वसतीगृह अधीक्षक

(पुरुष)

माजी/नागरी संवर्गरुपये 24,875/-1
2पहारेकरी (पुरुष) (निवासी पद)माजी/नागरी संवर्गरुपये 19,992/-1
3माळी (पुरुष)माजी/नागरी संवर्गरुपये 12,493/-1
4स्वयंपाकी (महिला)माजी/नागरी संवर्गरुपये 13,328/-3
5सफाई कामगारमाजी/नागरी संवर्गरुपये 12,493/-1
माजी सैनिक विश्रामगृह, सावंतवाडी
1पहारेकरी (पुरुष)  (निवासी पद)माजी/नागरी संवर्गरुपये 19,992/-1

इच्छुक माजी सैनिक/ माजी सैनिक पत्नी यांनी सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक/माजी सैनिक विधवा ओळखपत्र आणि नागरी उमेदवारांनी २ फोटो, आधार कार्ड व बँक पासबुक या कागदपत्रांसह दिनांक १ जुन २०२५ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत भेट देऊन स्वतः अर्ज सादर करावेत. माजी सैनिक प्रवर्गातुन उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी संवर्गातुन अशासकीय पदे भरण्यात येतील याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी (कामाचे स्वरुप कामाचा अवधी) दुरध्वनी क्र- ०२३६२-२२८८२०/ ९३२२०५१२८४ वर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा