You are currently viewing कुडाळ मध्ये २४ एप्रिल रोजी रेडकर सरांचे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

कुडाळ मध्ये २४ एप्रिल रोजी रेडकर सरांचे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

*कुडाळ मध्ये २४ एप्रिल रोजी रेडकर सरांचे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन*

कुडाळ

माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकाराने गुरूवार, २४ एप्रिल २०२५, सकाळी ९.०० वाजता,
न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे भविष्यात प्रशासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा वासियांसाठी निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर‌ मार्गदर्शनाचे प्रमुख मार्गदर्शक, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र, श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार (SSC JHT EXAM 2017, AIR 166) असून खुल्या प्रवर्गातील वय वर्ष ३८ व मागासवर्गीय प्रवर्गातील वय वर्ष ४१/४३ वयोगटातील विद्यार्थी व व्यक्तींनी त्याचप्रमाणे पालक व शैक्षणिक ज्ञान घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षण प्रेमींनी या ३२५ व्या निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचा लाभ घ्यावा. कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क नाही. फक्त माहिती लिहून घेण्यासाठी वही व पेन सोबत असू द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा