You are currently viewing राजमाता जिजाऊ या विषयावर राज्यस्तरीय चित्ररंगभरण स्पर्धेत बारा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

राजमाता जिजाऊ या विषयावर राज्यस्तरीय चित्ररंगभरण स्पर्धेत बारा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

राजमाता जिजाऊ या विषयावर राज्यस्तरीय चित्ररंगभरण स्पर्धेत बारा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग-*

*उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित विजेत्यांचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न*

साई कला आविष्कार नाट्य संस्था भोसरी व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान पुणे, नक्षत्राचं देणं काव्यमंच यांच्या वतीने दरवर्षी विद्यार्थी वर्गामध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हावी. कलासक्त नागरिक घडावे म्हणून भव्य अशी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी ,इंग्रजी सर्व शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. या स्पर्धेत संस्थेच्या वतीने चित्र रंगविण्यासाठी देण्यात आले .तसेच रंगवलेल्या चित्रातून उत्तम तीन क्रमांकांना बक्षिस समारंभ देण्यात आले . त्यांना गोल्डमेडल व प्रत्येक सहभागी ला आकर्षक फोर कलर प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले .
सलग चौदाव्या वर्षी सुद्धा या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. गोंदिया, नांदेड, नंदुरबार, सोलापूर, नाशिक, इगतपुरी, रायगड,ओतूर,साकोली, शिरोली बुद्रुक,मंगळवेढा, इगतपुरी, सटाणा, नांदेड,चाकण, मोशी ,नंदुरबार भंडारा,पुणे जिल्हा, सिन्नर, जुन्नर, उरुळी कांचन, दौंड खडकी, चिंचवड ,पिंपळे गुरव,पिंपरी ,काळेवाडी निगडी, आकुर्डी इ. अनेक विभागातून या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
उत्कृष्ट शाळा सहभागाबद्दल ‘राज्यस्तरीय सहभाग दौलत पुरस्काराने ‘सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय ,उरुळी कांचन, जयहिंद इंटरनॅशनल पब्लिक स्कुल, कुरण, संत थॉमस इंग्लिश मीडियम स्कूल, खडकी ,पुणे यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक सुप्रसिद्ध साहित्यिक ,समाजसेवक ,आर्टिस्ट डॉ. शांताराम कारंडे, मुंबई यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की,”साई कला आविष्कार नाट्य संस्था गेली पंचवीस वर्ष अनेक प्रकारच्या माध्यमातून कलाकार घडवण्याचे काम करत आहे. भविष्यात सुद्धा या संस्थेतून गुणवंत कलाकार घडतील अशी आशा आहे. मी संस्थेची गेले पंचवीस वर्षे जोडलेलो आहे. संस्थेची वाटचाल ही कौतुकास पात्र आहे. निस्वार्थ भावनेने काम करणारे, हे सर्व कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने काम करत आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्षा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज प्रा. शितल मालुसरे, रायगड हया उपस्थित होत्या. आपल्या मनोगतात प्रा. शितल मालुसरे म्हणाल्या की,”नवचैतन्य निर्माण करणारी ही संस्था आहे. तळागाळातील सर्वांना सोबत घेऊन त्यांच्यावर कौतुकाची थाप पडावी. यासाठी सातत्यपूर्ण काम करणारी ही क्रियाशील संस्था आहे. संस्थेच्या विविध उपक्रमामध्ये आपण सहभाग घेऊन आपल्याला व्यासपीठ मिळवावे .अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते.अनेकांना सन्मान देऊन गौरवविणे , समाजातील चांगल्या माणसांना घडविणारी संस्था आहे.संघटन हि काळाची गरज आहे.विधायक काम करण्यासाठी संघटन आवश्यक आहे.”

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योजक कृष्णकुमार गोयल आपल्या मनोगतात म्हणाले की,”अनेक मान्यवर मंडळींची दखल घेऊन त्यांना गौरवविणे हे समाज जिवंत ठेवण्याचे काम संस्था करत आहे.मी संस्थेच्या कार्याशी अनेक वर्षांपासून जोडलो आहे.आज विद्यार्थी वर्गाला बक्षिसे देताना आनंद होत आहे .मुख्याध्यापक कलाशिक्षक विद्यार्थी यांना संस्थेने माझ्या शुभहस्ते गौरविले.याचा आनंद होत आहे.भविष्यात हि संस्था अनेक कार्य पार पाडेल.अशी आशा आहे.पंचवीस वर्ष कलेचा यज्ञ ठेवत ठेवण्याचे काम संस्थेने केले आहे.”

या कार्यक्रमात ह.भ.प. प्रा. डॉ रवींद्र सोमोशी-पोलादपूर,वाळीबा पोपेरे-बदलापूर ,दत्तात्रय गायकवाड -भोसरी, संदीप तापकीर -च-होली,यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.कवी रामदास अवचर -सुपे, कवयित्री अंजू सोनवणे- चिंचवड ,कविवर्य प्रा उन्मेश शेकडे-लातूर यांना नक्षत्राचं देणं काव्यमंच वतीने नक्षत्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मुख्याध्यापक वसंत मोरे -भोसरी, रावसाहेब पवार-नाशिक,अक्षय पवार अहिल्यानगर,सौ.मधुरा कोळी -सोलापूर, यशवंत घोडे -जुन्नर यांना देऊन गौरवण्यात आले.
तसेच राज्यस्तरीय गुणवंत बाल कलाकार पुरस्काराने स्वराज सोसे यांना गौरविण्यात आले.

याप्रसंगी साईराजे पब्लिकेशन वतीने कवी रामदास अवचर (सोनसळी), कवी प्रा नरेंद्र पोतदार (शब्दभाव), कवयित्री ज्ञानेश्वरी पौळ (मी एक एकांत कवी), कवयित्री दिव्यश्री सावंत (अर्थ) या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षाला पाणी घालून, वृक्ष पूजन करून डॉ. शांताराम कारंडे- मुंबई यांच्या शुभहस्ते करण्यात कार्यक्रमाचे अध्यक्षा प्रा. शितल मालुसरे -रायगड, ह भ प प्रा. डॉ. रवींद्र सोमोशी -पोलादपूर, प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रास्ताविक साई कला आविष्कार नाट्य संस्था संस्थापक -अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी केले.यात संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या कार्याचा घेण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ रूपाली भालेराव यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नवनाथ पोकळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये विकास राऊत,यशवंत घोडे, डॉ अजय सकपाळ, पियुष काळे, बबन चव्हाण, जुई यादव, यशवंत गायकवाड, नवनाथ पोकळे,सुनिल पोटे,अनिता बिराजदार इ.नी पुढाकार घेतला.
विश्व गीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व विजेते
विद्यार्थी ,कलाशिक्षक, मुख्याध्यापक यांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह ,सन्मानपत्र ,
गुलाब पुष्प ,देऊन गौरवण्यात आले. हा सोहळा अतिशय उत्साही वातावरणात सायन्स पार्क नाट्यगृह ,चिंचवड येथे संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा