_*लहान मुलांसाठी समर वर्कशॉपचे आयोजन….*_
_*भोसले इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम….*_
सावंतवाडी
_यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने २६ ते ३० एप्रिल या कालावधीत लहान मुलांसाठी समर वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणारी ही कार्यशाळा रोज संध्याकाळी चार ते सहा या वेळेत भरेल. यामध्ये सहभागी होणाऱ्या मुलांना वयोगटानुसार तीन गटांमध्ये विभागले जाईल. तीन ते सहा वयासाठी पहिला गट, सात ते आठ वयासाठी दुसरा गट आणि नऊ ते बारा वयासाठी तिसरा गट असेल. प्रत्येक गटानुसार ज्ञानवर्धक, मनोरंजनात्मक आणि स्पर्धात्मक उपक्रम घेतले जातील. यामध्ये सहभागी होण्यासाठी ७८७५१४९७१७ या क्रमांकावर नोंदणी करावी असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे._

