दोडामार्ग भाजपा मंडल अध्यक्षपदी दीपक गवस
*तालुक्यात भाजपा नंबर वन करण्यासाठी सर्वाना सोबत घेवून जाणार: दीपक गवस
दोडामार्ग
नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष दीपक गवस यांचे अभिनंदन व नियुक्ती पत्र दोडामार्ग निरीक्षक महेश सारंग यांच्या हस्ते भाजपा कार्यालय दोडामार्ग येथे वितरित करण्यात आले. यावेळी सर्वाना सोबत घेवून भाजपा पक्ष तालुक्यात नंबर एकचा पक्ष बनवू असा विश्वास नवनिर्वाचित मंडळ अध्यक्ष दीपक गवस यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, पक्षातर्गत कोणतेही वाद यापुढे रहाणार नसून सर्वजण एकदिलाने काम करू आणि भाजपाचा झेंडा आगामी निवडणुकी फडकवू असेही शेवटी दीपक गवस म्हणाले.
यावेळी महेश सारंग,मंदार कल्याणकर, राजेंद्र म्हापसेकर, विजयकुमार मराठे, दीपक गवस, चेतन चव्हाण, संतोष नानचे,पराशर सावंत, चंद्रकांत मळीक, दिक्षा महालकर, वंदना ठाकूर, संध्या प्रसादी उपस्थित होते.
