You are currently viewing विश्वासघात

विश्वासघात

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती रायबागकर महाजन लिखित आशयघन काव्यरचना*

 

मित्र कोण शत्रू कोण, गणित साधे कळले नाही

नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही

 

सुरेश भट

________________________

 

विश्वासघात

 

विश्वासाने मान ठेवली, खांद्यावर मी ज्यांच्या

केसानेच गळा कापतील, स्वप्नातही वाटले नाही

 

गोड बोलणे ऐकून ज्यांचे, होते मी निर्धास्त

शब्दांचेच घाव घातले, सावध राहिले

नाही

 

कोकिळेचे कूजन ऐकण्या, आसुसले

कर्ण

काकध्वनिचे सूर कर्कश, मनास रुचले नाही

 

फुले घेण्यास्तव हात पुढती, केला

परंतु

शूल टोचता नयनी अश्रू, कोणीच पुसले नाही

 

अंतर थोडे चालत आले, सोबत माझ्यापाठी

चौरस्त्यावर भ्रमित उभी मी, मागे पावले नाही

 

आयुष्याच्या या वळणावर, ‘भारतीस’ कळो आले

एकल्या प्रवासाचे प्राक्तन, कुणास चुकले नाही

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा