*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शब्दांना माझ्या…टेहळणीचा अधिकार*
स्वतःची ओळख लपवाया
टोपणनावाची गरज भासते
अंगात…”मी “आला की…
शिररस्त्यांने मिरवावेसे वाटते..
शब्दांना माझामीच दिला
स्वच्छंद टेहळणीचा अधिकार
दाखवा तळपती मर्दुमकी..नाहीतर
म्यान करून टाका…तलवार ..
शब्दचं..माझे सगेसोयरे
त्यांनीच घेतली सुपारी
प्रतिष्ठेची सुरक्षा शब्दांना
बसवले मलाच… घरी..
लय.. ठसका.. उखाणा
शब्द माझे..मलाच घालतात
टोपणनाव धारण कर..नाहीतर
बुलडोझरची भीती दाखवतात..
शब्दांच्या बांधकामावर हातोडा
खंडपीठाने कानउघाडणी केली
जमीन शब्दांची इनामातली
माझ्याकडून काढून घेतली..
मुसक्या आवळल्या माझ्या
वेठीस… औटघटकेचा राजा
अस्तरचं.. लगडलं….. माझं
भूमंडळी टोपणनावांचा गाजावाजा
बाबा ठाकूर.

