*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पाऊस तुझ्या आठवणींचा*
प्रकार:-ओळकाव्य
*पाऊस तुझ्या आठवणींचा*
बरसतो मम हृदयी खोल
आठवती मज प्रसंग सारे
कसा सावरू माझा तोल
ठाण मांडतो जिद्द करुनी
*पाऊस तुझ्या आठवणींचा*
कसे थांबवू या गनिमाला
मनात गुंता साठवणींचा
काही कळेना काय करावे
पाठलाग हा करी निरंतर
*पाऊस तुझ्या आठवणींचा*
ओलांडेल का नश्वर अंतर ?
बोल तुझे रे मज आठविती
दिन आठवतो पाठवणीचा
पिया किती हा मजला छळतो
*पाऊस तुझ्या आठवणींचा*
प्रतिभा पिटके
अमरावती

