You are currently viewing बांदा महापुरुष देवस्थानात वार्षिक पूजा उत्साहात….

बांदा महापुरुष देवस्थानात वार्षिक पूजा उत्साहात….

बांदा महापुरुष देवस्थानात वार्षिक पूजा उत्साहात….

बांदा

बांदा-देऊळवाडी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक येथील श्री देव महापुरुष देवस्थान येथे आयोजित वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात झाला. महापुरुष मित्रमंडळातर्फे या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्री देव महापुरुष तसेच श्री सत्यनारायण पुजा करण्यात आली. पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली नाना सावंत यांनी सपत्निक पूजन केले. भाविकांच्या उपस्थितीत दुपारी महाआरती होऊन सर्वांच्या कल्याणासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. संध्याकाळी भजन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने

या सोहळ्याचा लाभ घेतला. महापुरुष मित्रमंडळ ,आमची वाडी देऊळवाडी मंडळाचे सर्व कार्यकर्ते, महिला सदस्य तसेच येथील व्यापारी बांधवांनी या सोहळ्याच्या आयोजनासाठी विशेष परीश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा