*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*घेईन भरारी*
दशाक्षरी
आव्हानांचे लावून अत्तर
घेईन भरारी गगनात
सजवुन यशाची सुमने
फुलविन आशा जीवनात १
कधी रंगविन चित्र नवे
स्वप्न बघुनिया नयनात
नवतेजाचे रंग तुषार
उधळून तप्त हृदयात २
आकाश ठेंगणे मजसाठी
क्षितिजाशी नाते जुळतांना
कोण मज अडवू शकेल
ध्येय माझे पूर्ण करतांना 3
अपयश मिळेल मजला
भीती मुळीच नाही मनात
पुरुषार्थ , साद घालतसे
प्रकाश येतांना जीवनात ४
कितीही संकटे आली तरी
नाही कधी मला थांबायचे
वादळाशी झुंजून नेटाने
यश मजला मिळवायचे ५
प्रतिभा पिटके
अमरावती

