You are currently viewing अनाथाची जात काय !

अनाथाची जात काय !

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अनाथाची जात काय !*

 

सर!जात म्हणजे …काय ?

तुमची सर !जात ..काय ?

काळजावर सर्रकन ओरखडा उमटला

थंड शिसारी अंगावरून गेली

आता या अनाथ पोरीला काय सांगाव

जातीनं हजार वर्ष आमची लक्तरे झाली

 

सर!माझी जात काय?

माझी जात ..शाळेत नाही लिहीली

अनाथाला… जात नसते काय?

जात!माहित नाही!कार्डवर नोंदली

कुणी विचारलीच तुला… जात तुझी

सांग..भारतमाता ..ही जात माझी!

तिला बहुदा ते पटलं नसावं ..

भारतमाता सांगेल का जात माझी?

फळ्यावर हताश भारतमातेच्या

तिरंग्याकडे डोळे रोखून ती बघत राहिली

मी भरलेल्या डोळ्याने पहात तिच्याकडे

शरमेने माझी मान झुकवली ..

 

भारतमातेकडे पहायची

माझ्यातही हिम्मत नव्हती

तिच्यासोबत मी ही अनाथ

जातीनं माजवली ही अधोगती

बरचं झालं !अनाथाला जात नाही

कोणताही संघर्ष नाही..लढा नाही

नाही उरली..जात माझी..अनाथ मी

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा