महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी -मंत्री नितेश राणे
बाबासाहेबांच्या जयंतीदिनी केले अभिवादन
कणकवली
भारतीय घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीदिनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली बुद्धविहार येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पून अभिवादन केले. महामानव बाबासाहेबांमुळे आम्ही नागरिक म्हणून जगत आहोत असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले .सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरवादी सर्व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हे राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे, असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मिस्त्री, माझी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, विठ्ठल देसाई, अंकुश कदम, नामदेव जाधव उपस्थित होते.