*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रज्ञासूर्य …*
महू गावी जन्मला भीम तो बाबासाहेब झाला
कोणकोणत्या दिव्यातून तो त्या काळी गेला..
तरीही बोलला नाही काही तो बैलगाडी मिळेना
मुंबई विद्यापीठांत शिकला डिग्रीही उरेना…
किती त्या पदव्या गणती नाही पुस्तके गाडाभर
अजून कायदे त्यातच बघती आपले पदवीधर…
१८/१८ तास अभ्यास फक्त खाऊनी पाव
“ब्र” न काढला धन्य रमाई धन्य तिचे नाव…
किती लेकरे भुईत गेली दवा मिळेना, पैसा
शेण थापूनी दिवस काढले जीव तो वेडापिसा…
लंडन मध्ये शिकले बाबा नव्हती जरी औकात
विश्वविजयी होऊन आले मायभूमी भारतात…
बनून कायदामंत्री केले कायदे विधायक
घटना लिहिणे नव्हते सोपे बनले महानायक…
कदर न झाली “वेड्या लोकी” बाबा कळले नाही
बळी किती ते बुद्धिवंत हो राजकारण आहे “खाई”….
“आचंद्रसूर्य” बाबा राहतील दगडावरची रेघ
जातील किती त्या पिढ्या परंतू , पूर्ण न होईल
पुस्तकांचा शोध…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)