You are currently viewing डॉ रमाकांत गावडे यांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचा पुरस्कार 

डॉ रमाकांत गावडे यांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचा पुरस्कार 

सावंतवाडी :

सावंतवाडी भंडारी भवन येथे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्यभरातील सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव आदर्श पुरस्कार देऊन करण्यात आला. यामध्ये 500 शिक्षकातून 10 शिक्षक निवडण्यात आले. पहिल्या टप्प्यात आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून बांदा येथील गोगटे वाळके कॉलेच्या डॉ.प्रा.रमाकांत गावडे यांचे नाव निवडण्यात आले. 28 फेब्रुवारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ.रमाकांत सीताराम गावडे M. COM, M. A.,Ph.D गोगटे वाळके कॉलेज बांदा, राहणार चौकूळ. गेली 25 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असून आता पर्यंत शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रात अनेक मुलांना मदत केली. तसेच मराठी शाळेतील मुलांना शासनाच्या दत्तक पालक योंजनेत प्रत्येकी 3000 रुपये भरून मदत केली आता पर्यंत मुंबई विध्यापिठाचा उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी म्हणून पुरस्कार, 2022-23 आणि 23-24 असा सलग दोन वर्ष उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र यांचा उत्कृष्ठ तालुका समन्वयक राज्यस्तरीय पुरुष्कार मिळाला. अनेक सामाजिक कार्यात सहभाग अनेक संथाच्या अध्यक्ष मार्गदर्शक व सल्लागार म्हणून कामगिरी आणि शैक्षणिक कार्य या बाबत 2021-22 मध्ये शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श शिक्षक सेवा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

गेल्या वर्षीचं राजस्थान विदयापीटा मार्फत कोकणातील काजू कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्या यावर विषयात Ph. D संपादन केली. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर राज्य कार्याध्यक्ष प्रकाशभाई कोळी, सरचिटणीस चंद्रकांत धडकेमामासाहेब, उपाध्यक्ष गोल्डमॅन बशीरभाई कुरेशी, जितेंद्र खानविलकर, राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र राज्य सल्लागार डॉ. गोरख बोबडे, चित्रपट सेना सरचिटणीस सचिन जुवाटकर, चित्रपट सेना महाराष्ट्र राज्य सचिव अक्षय म्हात्रे, महेश परब, अमोल डांगे मुंबई सहसचिव, सुभाष गजरे, जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आता पर्यंत डॉ गावडे यांना केंद्र शासनाने पुरस्कार दिलेला असून उच्च व तंत्र शिक्षण विभागा मार्फत सलग दोन वर्ष राजस्तरीय पुरस्कार दिला. डॉ गावडे यांच्या कडे सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुका समन्वयक म्हणून जबाबदारी महाराष्ट्र शासनाने दिली. या वेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांच्याकार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपाध्यक्ष गोल्डमॅन बशीरभाई कुरेशी, यांनी यावेळी संघटनेच्या कामाबद्दल कौतुक केले. यावेळी गायक अक्षय म्हात्रे यांनी उदयनराजेंवरील सुप्रसिद्ध गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सचिव रामचंद्र कुडाळकर, खजिनदार ज्ञानेश्वर पारधी, सहसचिव कल्याण कदम, जिल्हा प्रवक्ते शिवा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश माणगावकर, पूजा सोनसुरकर, पुजा गावडे, नारायण सावंत, सुधीर धुमे, संजय गावडे, महेंद्र चव्हाण, सेजल पेडणेकर, मिलिंद डोंगरे, संचिता गावडे, अनघा रांगणेकर, केशव जाधव, अमर पाटील, उमेश तळवणेकर, संदीप चांदरकर, सचिन गावडे, श्याम सावंत, अंकिता सावंत, सुभाष गावडे, मकरंद मेस्त्री, संगीता पारधी साक्षी तळवणेकर, अंकिता माळकर, लक्ष्मण पेडणेकर आदींसह राजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक रामचंद्र कुडाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी तर आभार कल्याण कदम यांनी मानले.

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज संस्थापक असलेल्या राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभरातील सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव राज्यस्तरी आदर्श पुरस्कार देऊन करण्यात आला. सावंतवाडी येथील भंडारी भवन येथे हा सोहळा संपन्न झाला. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. राजेंसोबत आम्ही काम करत आहोत हे आमचं भाग्य आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही चांगल काम सुरू आहे याचा आनंद अधिक आहे असं मत व्यक्त केले. राजे प्रतिष्ठान कामगार सेना उल्लेखनीय कार्य करत असल्याचे प्रतिपादन राज्यसरचिटणीस चंद्रकांत धडकेमामासाहेब यांनी केले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमास संघटनेचे संस्थापक छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिले असे यावेळी मार्गदर्शन पर विचार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा