*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सांग ना आई*
एवढे मोठे आभाळ आई
नाही याला खांब
पडत नाही कसे ?बाई ?
आई मला सांग
स्वच्छ आणि निरभ्र
निळा याचा रंग
कशा येतात धारा, आई
पावसाच्या संग?
निळा निळा ढग
कधी होतो काळा
देवबाप्पा सुरु करतो
का? गं मग पावसाळा?
किती हे दुरवर
पसरलेले क्षितिज
कसे बरे टेकले ते
गोष्टच अजब—
नभी येता सूर्य
चंद्र होई गडप
कुठे लपवतो हा
चांदण्यांचा कळप—
रोजच त्यांचा रात्रीस
खेळ चाले
बघ ना किती अगणित
दिस झाले—-
ढगांचा किती हा
अमाप ढिग झाला
जणू ठेवला रचुनी
कापूस पिंजलेला—-
सांज होता रंग सोनेरी
ढगालाच येई
सूर्य मावळ ताच
अंधारास पुर येई—
एवढे मोठे तळे
ढगा वरी का ग आहे,?
पावसाच्या रूपाने
धरे वरी येऊ पाहे—-
कधीतरी इंद्रधनुचे
कमान उभारी
कोण आहे ग अवलिया
असा हा रंगारी—-
. *शीला पाटील.चांदवड*