You are currently viewing परब मराठा समाज सिंधुदुर्ग तर्फे वांयगणी गावच्या सान्वी परब हिचा सत्कार

परब मराठा समाज सिंधुदुर्ग तर्फे वांयगणी गावच्या सान्वी परब हिचा सत्कार

परब मराठा समाज सिंधुदुर्ग तर्फे मालवण तालुक्यातील वांयगणी गावची सुकन्या कु. सान्वी विक्रम परब हिचा ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक व एसटीएस परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल परब मराठा समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री गुरूदास परब यांच्या हस्ते गुलाबपुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी परब मराठा समाज सिंधुदुर्ग चे कार्यकर्ते श्री सुशील परब (कुंदे), श्री आनंद परब (आकेरी), श्री विनोद परब (कसाल), श्री मारुती परब (ओरोस) हे उपस्थित होते.

विशेष म्हणजे कु. सान्वी परब ही इंग्लिश मिडीयमची विद्यार्थी असूनही तिने ही परीक्षा मराठीतून दिली आहे. त्यामुळे तिचे खास अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा