*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम लावणी*
*या उकाड्यानं बाई*
या उकाड्यानं जीव, हैराण झाला बाई
थंडाव्याला आणा राया, जाई आणि जुई
सांज उतरून येता
जीव कासविस झाला
माझी नाजूकशी काया
देह घाममध्ये न्हाला
चान्नी उगवेल अर्ध्या रात्री, कशाला घाई
थंडाव्याला आणा राया, जाई आणि जुई
नाजुकशी, मखमली
तिचा जीवघेणा गंध
दर्वळता सांजवेळी
मन माझे होई धुंद
तुमच्या बिगर राया कळी खुलणार न्हाई
थंडाव्याला आणा राया, जाई आणि जुई
थंड वाऱ्याच्या त्या सवे
रात गर्द होत जावी
तुमच्या रांगड्या स्पर्शाने
कळी उमलून यावी
पहाटेचा गार वारा, सभोवती जाई
थंडाव्याला आणा राया,जाई आणि जुई
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
@ सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे