रंगोत्सव सेलिब्रेशन आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी :
सावंतवाडी
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी रंगोत्सव सेलिब्रेशन आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भरभरून यश मिळवत उत्तुंग भरारी घेतली. यामध्ये इयत्ता ६ वी मधील कु. श्री तुषार कोरगावकर हिने कलरिंग कॉम्पिटीशनमध्ये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकवत गूगल अलेक्सा व चषक मिळविले. इयत्ता २ री मधील कु. साईराज अजय तोरस्कर याने कलरिंग कॉम्पिटीशनमध्ये बोट एक्सटेंड स्मार्ट वॉच व चषक प्राप्त केले. इयत्ता १ ली मधील कु. अन्वित क्रिष्णा साळगावकर याने फिंगर अॅण्ड थंब कॉम्पिटीशनमध्ये चौथ्या क्रमांक व गिटार म्युझिक किट व चषक पटकावले. इयत्ता ४ थी मधील कु. फेथ सविओ फर्नांडिस हिने कलरिंग कॉम्पिटीशनमध्ये याने क्रिएटिव्ह आर्टिस्ट अवॉर्ड मिळवून एचडी फुल डिजिटल कॅमेरा व चषक प्राप्त केले. इयत्ता ६ वी मधील कु. अस्मी अमेय प्रभू टेंडोलकर हिने मास्क मेकिंग कॉम्पिटीशनमध्ये चषक व दैदिप्यमान कामगिरी बद्दल पुरस्कार प्राप्त केला. इयत्ता ४ थी मधील कु. लिशा जगन्नाथ सामंत व इयत्ता ५ वी मधील कु. अवनी मंगेश शेर्लेकर यांनी कलरिंग कॉम्पिटीशनमध्ये अनुक्रमे चषक व दैदिप्यमान कामगिरी बद्दल पुरस्कार प्राप्त केले. इयत्ता ५ वी मधील कु. सौजन्या सत्यवान काजरेकर हिने हस्ताक्षर स्पर्धेत चषक व दैदिप्यमान कामगिरी बद्दल पुरस्कार प्राप्त केला. इयत्ता ४ थी मधील कु. सई सुधीर नाईक, इयत्ता ३ री मधील कु. आरोही गावडे, इयत्ता ६ वी मधील कु. हिना सारंग व इयत्ता ५ वी मधील कु. सौजन्या काजरेकर, इयत्ता २ री तील कु. राधेय राजेश मोरजकर यांनी फिंगर व थंब कॉम्पिटीशनमध्ये आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त केले. तसेच कलरिंग कॉम्पिटीशनमध्ये इयत्ता ३ री मधील कु. श्रीहान प्रशांत मुंज, इयत्ता १ ली मधील कु. मिहिरा राजाराम खटावकर, इयत्ता २ री मधील कु. सायली चंद्रशेखर बांदेकर , कु. निहिरा गौरिष राणे, कु. आकांक्षा मंदार उरणकर व कु. रुद्र संतोष देसाई, इयत्ता ६ वी तील कु. तनिष्क राजेश पवार व कु. इशान सचिन राऊळ, इयत्ता ५ वी तील कु. राबिया रफिक जमादार व कु. मनवा प्रसाद साळगावकर, इयत्ता ४ थी तील कु. रणवीर किरण रांजणे .
तसेच, हस्ताक्षर स्पर्धेत इयत्ता ३ री मधील कु. नविण्या कृणाल कोरगावकर, इयत्ता २ री तील कु. तन्मय प्रशांत परब, कु. अस्मी परशुराम सावंत, तसेच टॅटू मेकिंग स्पर्धेत इयत्ता ४ थी तील कु. शुभ्रा संदीप चव्हाण, तर मास्क मेकिंग मध्ये इयत्ता ५ वी मधील कु. देवांग महेश सारंग या वरील सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त झाले. तसेच, स्केचिंग कॉम्पिटीशनमध्ये इयत्ता ५ वी मधील कु. इशान दत्तात्रय किनळेकार, कु. राबिया रफिक जमादार, त्याचप्रमाणे कोलाज मेकिंग स्पर्धेत इयत्ता २ री मधील राधेय राजेश मोरजकर व कॅरिकेचर कॉम्पिटीशनमध्ये इयत्ता ३ री तील कु. सार्थक स्नेहल मालवणकर, टॅटू मेकिंग कॉम्पिटीशनमध्ये इयत्ता ३ री मधील कु. प्रार्थना प्रणय नाईक या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ सरप्राईझ गिफ्ट प्राप्त केले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रशालेतील कला विषयाच्या सहा. शिक्षिका सौ. सुषमा पालव व कु. विनायकी जबडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे , रंगोत्सव सेलिब्रेशन तर्फे प्रशालेेस ग्लोबल स्कूल अवॉर्ड जाहीर केले गेले. शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी वरील स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.